Tuesday, 9 December 2014

पहिले कर्नाटक युध्द (१७४६-१७४८) :-

 युरोपात ऑस्ट्रियाच्या वारसा युध्दाचा प्रारंभ झाल्यांवर त्याचाच झालेला विस्तार म्हणजे कर्नाटकाचे पाहिले युध्द होय. आपल्या मूळ देशांच्या आदेशाविरुध्द भारतातील इंग्रज व फ्रेंचांनी १७४६ मध्ये संघर्ष सुरु केला. बारनेटच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमाराने फ्रेंचांची काही जहाजे पकडली त्यामुळे पॉंडेचरीचा फ्रेंच गव्हर्नर डुप्ले याने मॉरिशसचा फ्रेंच गव्हर्नर ला बोर्डोकडे मदत मागितली. डुप्लेच्या मदतीला ३००० सैन्यासह ला बोर्डो मद्रासजवळ असलेल्या कोरोमंडळ तटाकडे निघाला. मार्गात त्याने इंग्रजाच्या आरमाराचा पराभव केला. फ्रेंचांनी जल व स्थल अश दोन ठिकाणी मद्रासला घेरले. या युध्दात मद्रासच्या इंग्रजांचा २१ सष्टेंबर १७४६ रोजी पराभव कला फ्रेंचांनी मद्रास जिंकून घेतले. या प्रसंगी जे इंग्रजयुध्दकैदी पकडण्यात आले त्यात रॉर्बट क्लाईव्हही होता. मद्रासच्या इंग्रजांपासून खंडणी घ्यावी असे ला बोर्डेनिचे मत होते. पण डुप्लेला ते मान्य नव्हते. शेवटी एका मोठया रकमेच्या मोबदल्यात ला बोडॅनि मद्रास पुन्हा जिंकून घेतले. पण पाँडेचरीपासून फक्त १८ मैल दक्षिणेला असलेला सेंट डेविडचा किल्ला त्यास जिंकता आला नाही. अर्थात इंग्रजांनी पाॅंडेचरी जिंकून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न असफल ठरला. कर्नाटकच्या पहिल्या युध्दातील सेंट टोमेची लढाई महत्वाची समजली जाते. ही लढाई कर्नाटकचा नबाब अन्वरुद्दीन याच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्य आणि फ्रेंच सैन्य यांच्यात झाली. मद्रास फ्रेंचांनी घेतल्यापासून हा संघर्ष सुरु झाला आपल्या प्रदेशात दोन्ही परकिय कंपन्या लढत असलेल्या पाहून हा संघर्ष बंद करण्याची व प्रदेशांची शांतता भंग न करण्याची आज्ञम्प्;म्प्;ाा नवाबाने दिली. त्यावर डुप्लेने आपले आश्र्वासन न पाळल्याने आपली मागणी पूर्ण करण्यासाठी नबाबने सैन्य पाठविले. या तुकडीचे नेतृत्व कॅ पॅराडइज याच्याकडे होते. आणि महफूजखानच्या नेतृत्वाखालील १०,००० भारतीय सैनिकांना अडयार नदीजवळ सेंट टोमे येथे पराभूत केले. या विजयामुळे असंघटिक व अप्रशिक्षित भारतीय सैन्याच्या तुलनेत प्रशिक्षित परकिय सैन्याचे श्रेष्ठत्व दिसून आले. परंतु एक्स-ला शापेलच्या युरोपातील युध्द बंद होताच १७४८ पहिल्या कर्नाटक युध्दाचीही समाप्ती झाली. मद्रास इंग्रजांना पुन्हा परत मिळाले. या युध्दात फ्रेंचांचे श्रेष्ठत्व दिसून आले. डुप्लेची कूटनीती प्रदर्शित झाली. इंग्रजांना पॉंडेचरी जिंकून घेता आले नसले तरी त्यांना आरमाराचे महत्व लक्षात आले.

No comments:

Post a Comment