Wednesday, 10 December 2014

कोण कुठे जन्माला येईल


कोण कुठे जन्माला येईल हे आपल्या हाती थोडेच असते.
पुढचा सगळाच काळ मात्र आपल्या हाती असतो.
आपल्याला प्राप्त झालेला अवकाश आणि आपण वावरतो तो काळ यांची सांगड घालून आपण नवे काही साकारू शकतो. कुठेही जन्म झाला, कितीही खातेऱ्यात झाला तरी जगणे सजवता येऊ शकते. एकीकडे पराकोटीचे दारिद्रय़ आणि गरिबी दिसत असताना त्यावर मात करण्याचे काही प्रयोग दिसतात.
अखंड अशी धडपड या माणसांची चाललेली असते.
आपल्या वाटय़ाला जे काही आलेले असते ते प्राक्तन म्हणून स्वीकारण्याऐवजी आपण ठरवू तो आपला काळ आणि आपण चालू ती आपली दिशा,
या भावनेतून अशा आपला प्रवास चालला पाहिजे ......

No comments:

Post a Comment