ब्रिटिश
ईस्ट कंपनीतर्फे भारतात आलेल्या व्यापार्यांचा उद्देश व्यापार करणे आणि
त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवणे हा होता. पण भारतातही होणार्या
व्यापारात इंग्रजांना पोर्तृगीज, डच, फ्रेंच, अशा विविध युरोपियन
व्यापार्यांशी स्पर्धा करावी लागली. त्या वेळी भारतात कार्यरत असणार्या
डच ईस्ट इडिया कंपनीकडून व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीकडून जबरदस्त स्पर्धेला
तोंड द्यावे लागल्यामुळे ब्रिटिश कंपनीच्या व्यापारावर व नफ्यावर मर्यादा
आली. त्याला पर्याय व सर्वोत्तम मार्ग म्हणजे भारतीय व्यापार क्षेत्रातून
या स्पर्धेत कंपन्यांना समाप्त करणे होय. भारतात व्यापार करण्याच्या
निमिज्ञ्ल्त्;ााने आलेल्या पोर्तुगीजांनी व्यापाराबरोबर राज्यविस्ताराचे व
धर्मप्रसाराचे धोरण स्वीकारले म्हणून त्यांच्या सत्तेचा विस्तार भारतात
फारसा होऊ शकला नाही. याच सुमारास युरोपात इंग्लडने हॉलंडचा पराभव
केल्यामुळे भारतातील डच, व्यापारी निष्प्रभ झाले.
प्लासीच्या
युध्दांत इंग्रजांना विजय मिळाला. सिराजउद्दिला याच्या जागी इंग्रजांच्या
मदतीने मीर जाफर हा बंगालचा नबाब झाला. दिवसेदिवस इंग्रजांचे वर्चस्व
वाढत गेल्यामुळे तो भयभीत होऊ लागला होता. या वेळी बंगालमध्ये
इंग्रजांप्रमाणेच डच लोकही व्यापार करीत होते. इंग्रजांच्या वाढत्या
प्रभावामुळे त्यांच्या व्यापाराला धक्का बसल्याने ते इंग्रजांचा द्वेष
करीत होते. मीर जाफरने त्यांना इंग्रजांविरुध्द भकडावले. त्याचा परिणाम
असा झाली की इ.स. १७५९ मध्ये डचांनी इंग्रजांमध्ये निकराचा संघर्ष होऊन
त्यात इंग्लंडला विजय मिळाला. डच व इंग्रज यांच्यात तह होऊन डचांनी
इंग्रजांवर चढाई न करण्याचे सैन्य न पाठवण्याचे व वखारींची तटबंदी न
करण्याची हमी दिली. यांनतर बंगालमध्ये डचांनी पुन्हा डोके वर काढण्याचा
कधीच प्रयत्न केला नाही. इंग्रजांना आता भारतातील फ्रेंच हेच प्रभावी
विरोध करणारे प्रतिस्पर्धी होते.
No comments:
Post a Comment