व्यापार
करता-करता इंग्रज व फ्रेंच कंपन्या भारतीय राजकारणात प्रवेश करण्याचा
प्रयत्न करीत होत्या. या दोन्ही कंपन्यांचा मुख्य उद्देश व्यापारातून
जास्तीत जास्त फायदा करुन घेणे हा होता. भारतातील व्यापारातून आपल्याला
जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी इंग्लंड व फ्रान्स यांच्यात जणू
स्पर्धाच लागली होती. पण त्यातूनच त्यांच्यात भारतात सज्ञ्ल्त्;ाा
मिळविण्यासाठी जो प्रयत्न करण्यात आला त्यातून त्यांच्यात संघर्ष निर्माण
झाला.
१७ व्या आणि १८
व्या शतकात इंग्लड व फ्रान्स परस्परांचे कट्टर शत्रू होते. त्यामुळें
त्यांच्यात युध्द सुरु झाले की जगाच्या कोणत्याही भागात त्यांच्या कंपन्या
एकत्र कार्यरत असल्या म्हणजे त्यांच्यातही युध्द सुरु असे. ऑस्ट्रियाच्या
वारसा युध्दापासून भारतात इंग्रज फ्रेच संघर्ष सुरु झाला. फ्रेचंाचे
भारतातील मुख्य केंद्र पॉडेचरी असून मछलीपट्टम, कारिकल, माहेृ सुरत व
चंद्रनगर ही उपकेंद्रे होती. इंग्रजांनी आपले वर्चस्व मद्रास, मुंबई, व
कलकज्ञ्ल्त्;ाा या विभागावर आणि आजूबाजूच्या परिसरात प्रस्थापित केले
होते.
No comments:
Post a Comment